Main Featured

दिलदार बाहुबली! दिली मोठी भेट

prabhas

तेलुगू चित्रपटसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रभास(prabhas). ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. आता तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमधील एक आहे. नुकताच प्रभासने त्याच्या जिम ट्रेनरला एक महागडी कार गिफ्ट म्हणून दिल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.


गेल्या कित्येक दिवसांपासून प्रभास (prabhas)जिम ट्रेनर लक्ष्मण रेड्डी यांच्याकडे ट्रेनिंग घेत आहे. नुकताच प्रभासने त्यांना रेंज रोवर वेलार ही कार भेट म्हणून दिली आहे. या गाडीची किंमत जवळपास ७३ लाख रुपये आहे.

Must Read
लवकरच प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री पुजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाता फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. प्रभासचा आणखी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘आदिपुरुष’ असे आहे. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे.