Main Featured

IPL 2020: मुंबई इंडियन्सची चिंता वाढली


आयपीएलचा (IPL 2020) तेरावा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हंगामाचा पहिलाच सामना गतविजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) यांच्यात होणार आहे. 
आतापर्यंत 4 वेळा चॅम्पियन झालेल्या रोहित शर्माचा (Rohit Sharma) मुंबई संघ पुन्हा एकदा आयपीएल जिंकण्यासाठी सज्ज आहे. मुंबईचा संघ संतुलित असून सर्व खेळाडू फॉर्ममध्येही आहेत. दरम्यान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही आहेत. त्यामुळे संघाला थोडा झटका बसू शकतो.


Must Read


मुंबई संघात कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या (hardik Pandya), केरन पोलार्ड, ख्रिस लिन, जसप्रीत बुमराह सारखे स्टार खेळाडू आहेत. पोलार्डने नुकत्यात झालेल्या कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये आपल्या त्रिनबागो नाइट राइडर्स संघाला विजय मिळवून दिला होता. असे असले तरी, मुंबई संघापुढे एक चिंतेची बाब आहे. मुंबईचा पहिला सामना चेन्नई संघासोबत असणार आहे. गेल्या वर्षी अंतिम सामन्यात मुंबई संघानं चेन्नईला एका धावानं हरवलं होतं. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी चेन्नईचा संघ सज्ज आहे.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची ताकद
मुंबई संघाकडे जबरदस्त टॉप ऑर्डरचे फलंदाज आहेत. मुंबईने आपल्या संघात यंदा ख्रिस लिनला सामिल केले आहे. लिन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉकही आहे. कर्णधार रोहित शर्माही फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. यंदाच्या हंगामात रोहित शर्मा सलामीला नाही तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरू शकतो. संघात मोठ्य़ा प्रमाणावर अष्टपैलू खेळाडूही आहेत. पांड्या बंधूसोबतच केरन पोलार्डही आहेत. त्यामुळे रोहित आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन शानदार अष्टपैलू खेळाडू सामिल झाले.
मुंबई इंडियन्ससाठी फिरकी गोलंदाज चिंतेची बाब
मुंबई संघासाठी चिंतेची बाब आहे फिरकी गोलंदाज. संघ राहुल चाहर आणि कृणाल पांड्या सारखे फिरकी गोलंदाज असले तरी अनुभवी गोलंदाज नाही आहेत. संघात जयंत यादव आणि अनुकूल रॉय सारखे युवा खेळाडूही आहेत. त्यामुळे अनुभवी गोलंदाज नसल्यामुळे फिरकी गोलंदाजी कमकुवत दिसत आहे. त्यातच लसिथ मलिंगानं माघार घेतल्यामुळे जलद गोलंदाजीही चिंतेत आहेत. मात्र संघाकडे ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहसारखे जबदरस्त गोलंदाज आहेत.
मुंबईचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस लिन, सौरव तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, मिचेल मॅक्‍ग्‍लेघन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्‍ट, मोहसिन खान, प्रिंस बलवंत राय सिंह, दिग्‍विजय देशमुख, हार्दिक पांड्या, जयंत यादव, क्रुणाल पांड्या, अनुकूल रॉय, नॅथन कूल्‍टन नाइल, इशान किशन, क्विंटन डी कॉक, आदित्‍य तारे, जेम्‍स पॅटिंसन.