babri masajid resultबाबरी मशीद पतन प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने (court) आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नव्हते असे निरीक्षण न्यायालाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रान नोंदवले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोश मुक्तता केली आहे.  

बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे court सुनवणीदरम्यान निधन झाले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली. यानंतर फैजाबादमध्ये दोन FIR करण्यात आल्या. यातील एक FIR लाखो कार सेवकांविरोधात तर दुसरी FIR संघ परिवारातील कार्यकर्त्यांसह, आडवाणी, जोशी,  शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा नेत्या उमा भारती यांच्याविरोधत होती. 

Must Read

1) रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद
2) SBI-ICICI सह आज रात्रीपासून बंद होणार ही महत्त्वाची सेवा

3) रिया चक्रवर्तीने जाणिवपूर्वक केलं हे काम, एनसीबीचा मोठा खुलासा

4) दोन्ही राजांनी आरक्षणाचा प्रश्न भाजपकडून सोडवावा
5) टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो