Main Featured

कल्याण मटका घेतल्याप्रकरणी दोघांना अटक


                                 

इचलकरंजी येथे कल्याण मटका घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मटका बुकी विनायक सुरेंद्र हुक्कीरे (वय 38) व दिवाणजी शिवराज उर्फ शिवा आप्पासो सुतार (वय 22, दोघे रा. जवाहरनगर परिसर) या प्रकरणातील आणखी एकास यापूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली होती. शहरातील लिगाडे मळा (arrested for taking Kalyan Matka) परिसरात सौदर्या पान शॉपच्या बाजुस कल्याण मटका घेताना विशास सदाशिव पोवार (वय 35, रा. लिगाडे मळा) यास शिवाजीनगर पोलिसांनी 8 सप्टेंबर रोजी अटक केली होती. पोवार हा मटका बुकी विनायक हुक्कीरे व त्याचा दिवाणजी शिवा सुतार यांच्यासाठी घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तिघांवरही गुन्हा दाखल केला होता. पोवार यास पूर्वी अटक करण्यास आली होती. विनायक हुक्कीरे व शिवा सुतार यांना आज अटक करण्यात आली. दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता झाली.

हे वाचा