Main Featured

आता अ‍ॅपल देखील आणणार फोल्डेबल स्मार्टफोनiphone

सध्या बाजारात फोल्डेबल स्मार्टफोन (Smartphone)लाँच केले जात आहे. सॅमसंगने (samsung)आपला फोल्डेबल स्मार्टफोन काही दिवसांपुर्वी लाँच केला होता. आता टेक कंपनी अ‍ॅपल (Apple)देखील आपला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. अनेक रिपोर्टमध्ये याबाबत दावा करण्यात आलेला आहे, मात्र अद्याप कंपनीकडून याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.अ‍ॅपलने सॅमसंगकडून (samsung) फोल्डेबल डिस्प्ले खरेदी केल्याचे सांगितले जाते. Macrumors च्या रिपोर्टनुसार, अ‍ॅपल मोठ्या प्रमाणात सॅमसंगकडून फोल्डेबल डिस्प्ले नमुने खरेदी करणार आहे. कंपनी आधीपासूनच सॅमसंगचे ओलेड पॅनेल खरेदी करत आहे. अ‍ॅपलने ओलेड फोल्डेबल स्क्रिनसाठी सॅमसंगला ऑर्डर दिली आहे.

Must Read

अ‍ॅपल एक असा आयफोन तयार करण्याच्या विचारात आहे, जो गॅलेक्सी झेड फोल्ड प्रमाणे असेल. एक वर्षासाठी कंपनी डिस्प्लेची ऑर्डर दिली आहे. सॅमसंगने काही दिवसांपुर्वी 2 फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केले आहे. सॅमसंगला फोल्डेबल स्मार्टफोन तयार करण्याचा अनुभव आहे.
काही महिन्यांपुर्वी देखील अ‍ॅपल फोल्डेबल स्मार्टफोनवर काम करत असल्याची माहिती समोर आली होती. कंपनीने याचे पेटंट देखील केले असल्याचे सांगितले जाते.