Main Featured

अनुष्काच्या बेबीबंप फोटोशूटवर विराट म्हणाला....

Actress Anushka Sharma And Virat KohliEntertainment News-अभिनेत्री अनुष्का शर्मा (Actress Anushka Sharma)गरोदर असून नवीन वर्षात कोहली कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli)फेसबुकवर फोटो पोस्ट (facebook post)करत ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यानंतर आता अनुष्का शर्मा हिने देखील इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर विराटने दिलेली प्रतिक्रिया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on 
“जीवन निर्माण करण्याच्या अनुभवापेक्षा वास्तविक आणि नम्र काहीही नाही.” अशा आशयाचं कॅप्शन लिहून अनुष्काने बेबीबंपसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. “माझं संपूर्ण जग मला एकाच फ्रेममध्ये दिसतंय.” अशा आशयाची प्रतिक्रिया विराटने (Virat Kohli)या फोटोवर दिली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. २०१८ मध्ये ‘झिरो’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानं अनुष्काला अनेकांनी तिच्या ‘गुड न्यूज’बाबात प्रश्न विचारलं होतं. मात्र अनुष्कानं या चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगत गर्भवती असल्याची बातमी फेटाळून लावली होती. “मी सध्या माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. मला अन्य कोणत्याही गोष्टीसाठी वेळ नाही. काही वर्ष मी करिअरवर लक्ष केंद्रीत करणार आहे,” असं ती त्यावेळी म्हणाली होती. विराट-अनुष्काने आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करताच चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.