Main Featured

धोकादायक अ‍ॅप्स Google Play Store वरुन हटवले, तुम्हीही करा Delete

Play store

Google ने आपल्या प्ले-स्टोअरवरुन (Play store)१७ धोकादायक अ‍ॅप्स हटवले आहेत. जुलै ते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंतच्या कालावधीत हे १७ अ‍ॅप्स हटवण्यात आले आहेत. गुगलने जुलै महिन्यात ११ धोकादायक अ‍ॅप्स प्ले-स्टोअरवर बॅन केले होते, त्यानंतर काही दिवसांपूर्वी अजून ६ अ‍ॅप्स हटवले होते. हटवण्यात आलेले सर्व अ‍ॅप्स ‘मॅलवेअर जोकर’ या व्हायरसने इन्फेक्टेड आहेत.


सर्व १७ धोकादायक अ‍ॅप्स (Dangerous apps)प्ले-स्टोअरवरुन हटवले असले तरी जे युजर्स यांचा वापर करत होते त्यांच्या डिव्हाइसमध्ये अ‍ॅप्स अजूनही आहेत. फसवणुकीपासून वाचण्यासाठी हे अ‍ॅप्स डिलिट करण्याचं आवाहन युजर्सना करण्यात आलं आहे. 

Must Read

यातील ११ अ‍ॅप्स चेक पॉइंटच्या रिसर्चर्सनी जुलै महिन्यात शोधले. तर, नुकतेच हटवण्यात आलेले सहा धोकादायक अ‍ॅप्स सायबर सिक्‍युरिटी फर्म Pradeo च्या अभ्यासकांनी शोधले. २०१७ पासून गुगलने ‘मॅलवेअर जोकर’ने इन्फेक्टेड असलेले १७०० अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवले आहेत. पण दरवेळेस नव्या रुपात हा व्हायरस प्ले स्टोअरवर येत असतो.
बघुया कोणते आहेत हटवलेले Dangerous Apps :-
com.imagecompress.android
com.relax.relaxation.androidsms
com.file.recovefiles
com.training.memorygame
Push Message- Texting & SMS
Fingertip GameBox
com.contact.withme.texts
com.cheery.message.sendsms (two different instances)
com.LPlocker.lockapps
Safety AppLock
Emoji Wallpaper
com.hmvoice.friendsms
com.peason.lovinglovemessage
com.remindme.alram
Convenient Scanner 2
Separate Doc Scanner