Main Featured

अमिताभ बच्चन यांची मोठी घोषणा!




बॉलिवूड (bollywood) सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर तो अनेकदा चाहत्यांसाठी त्यांच्या वडिलांनी लिहलेल्या काही ओळी विविध फोटोंद्वारे शेअर करत असतात. विविध प्रकारे ते त्यांच्या चाहत्यांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करत असतात. आता बिग बींनी मोठा निर्णय घेत ऑर्गन डोनेट (organ donate)घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली.

अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan)  यांनी एक ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनी स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात त्यांच्या कोटवर एक लहान हिरव्या रंगाची रिबन दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी लिहिले की, 'मी ऑर्गन डोनर होण्याची शपथ घेतली आहे. यासाठी मी हिरवी रिबन लावली आहे.'

अमिताभ यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी अवयव दानाची (organ donate) शपथ घेतल्याचा स्वत:चा अनुभव शेअर केला आहे, तर काहींनी त्यांचे सर्टिफिकेट देखील शेअर केले आहे. तर काहींनी बच्चन यांच्यापासून प्रेरित होत ऑर्गन डोनर बनण्याचा निश्चय केला आहे.



वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या अमिताभ बच्चन विविध प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. सध्या ते कौन बनेगा करोडपतीचा 12 (Kaun Banega Crorepati 12) वा सीझनचे होस्ट करीत आहेत. याशिवाय अयान मुखर्जीचा सिनेमा ब्रह्मास्त्रमध्ये (Brahmastra) देखील अमिताभ दिसणार आहेत.

या चित्रपटात त्याच्यासोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी रॉय दिसणार आहेत. या चित्रपटाशिवाय ते नागराज मंजुळे यांच्या झुंड या चित्रपटातही काम करत आहेत. या चित्रपटाचा पहिला लूक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता.