artificial intelligence-alexaसमजा तुम्हाला कंटाळा आला आहे. एव्हाना सगळ्यांनाच घरी बसून कंटाळा आला आहे. तर तुम्ही शब्दांत तुम्हाला कंटाळा आला आहे हे सांगितलं नाहीत तरीही हा तुमचा एकाकीपणा किंवा कंटाळा तुमच्या बोलण्यातून ओळखता येऊ शकतो. आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा (artificial intelligence) वापर करून हे शोधता येतं आणि आता अमेझॉनची असिस्टंट अलेक्सा (alexa)आता तुमचा कंटाळा किंवा एकाकीपणा ओळखणार आहे.

वृद्ध आणि प्रौढ लोकांच्या एकाकीपणाचं प्रमाण समजण्यासाठी आणि त्यांच्या भाषेचं विश्लेषण करण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा उपयोग करता येतो, असं "यूसी सॅन डिएगो स्कूल ऑफ मेडिसिन"च्या (यूसीएसडी) संशोधकांच्या नेतृत्वाखालील पथकानं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या रिसर्च पेपरमध्ये म्हटलं आहे.'अमेरिकन जर्नल ऑफ जेरिअट्रिक सायकियाट्री'मध्ये प्रकाशित झालेल्या पेपरमध्ये सामाजिक एकटेपणाची रुंदी आणि खोलीचं अचूक मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

"संशोधनावेळी बहुतेकवेळा तुम्हाला आपण एकटे आहोत ही जाणीव कधी आणि किती वेळा होते? असे थेट प्रश्न विचारले जातात. ज्यात स्टिग्माशी संबंध असल्यामुळे कदाचित खरी उत्तरं न मिळता पक्षपाती किंवा ठरलेली उत्तरं मिळू शकतात. यूसीएलच्या स्केलमध्ये एकाकीपणा हा शब्द वापरला जात नाही, तरीही पक्षपाती उत्तरं मिळू शकतात, असं यूसीएसडी स्कूल ऑफ मेडिसिनमधील मानसोपचार विभागाचे सहाय्यक प्राध्यापक एलेन ली यांनी सांगितलं.

'एकाकीपणा मोजण्यासाठी प्रश्नांपेक्षा भावना, दिलेल्या प्रतिक्रिया आणि कृती यांचा अभ्यास करणं योग्य वाटत होतं. म्हणजेच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) एनएलपीचा वापर केला जात होता. आर्टिफिशियल इंटिलिजन्स (artificial intelligenceआणि मशीन लर्निंग सिस्टिम जसजशी प्रगत होत गेली तसतसं मनोविकृती, पीटीएसडी, बायपोलर डिसऑर्ड आणि नैराश्यासारख्या परिस्थिती ओळखण्यास सुरुवात झाली आहे,' असं न्यू अॅटलसच्या अहवालात म्हटलं आहे.

एनएलपी आणि मशीन लर्निंगचा उपयोग करून आपण अनेक मुलाखतींमध्ये व्यक्त झालेल्या भावनांसारख्या अनेक सूक्ष्म गोष्टींचं विश्लेषण करू शकतो. ज्यातून एकटेपणाची भावनाही शोधता येऊ शकते. अशाच प्रकारचं विश्लेषण माणसानी करायचं झालं तर पूर्वाग्रह, सातत्याचा अभाव आणि एका विशिष्ट दर्जाचं विश्लेषण मिळवण्यासाठी प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे." असं पोस्टडॉक्टोरल रिसर्च फेलो आणि या अहवालावरील लेखक वर्षा बादल यांनी सांगितलं.

एआय ही सिस्टीमच्या सहाय्याने एखाद्या व्यक्तीचा एकाकीपणा शोधण्यात 94 टक्के अचूकता साधता येते. एखादी व्यक्ती जितकी अधिक एकाकी असते, तितकाच अधिक वेळ ती एकाकीपणाविषयीच्या प्रश्नांना उत्तर देताना लावते.