Main Featured

ALERT! तुमच्या मोबाईलमधून SMS आणि नंबर चोरत आहेत हे 17 Apps


These 17 apps are stealing SMS and numbers from your mobile

चीन-भारत यांच्यातील तणावानंतर अनेक चिनी अॅपवर बंदी घालण्यात आली होती. त्यासोबतच आता गुगलनं देखील आपल्या प्ले स्टोरवरून व्हायरस आणि हॅकर्सना माहिती पुरवणाऱ्या अॅप्सना काढून टाकल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात आता जनजागृती कऱण्यात येत असून तुमच्या फोनमध्ये देखील असे अॅप असतील तर तातडीनं डिलिट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

गुगल प्ले स्टोरवरून व्हायरस पसरवून हॅक डेटा हॅक करणाऱ्या 17 अॅप्सना हटवण्यात आलं आहे. या अॅप्समध्ये जोकर मालवेअर असल्याचं समोर आलं त्यामुळे हे अॅप्स फोन किंवा लॅपटॉपसाठी धोकादायक असल्याची माहिती मिळाली आहे. हे अॅप्स सुमारे 1 लाख 20 हजार वेळा डाउनलोड केले गेले असून त्यातील बहुतेक स्कॅनर अ‍ॅप्स होते. यातले काही अॅप हे मेसेजसाठी तर काही फोटो एडिटिंगसाठी वापरण्यात येत होते.

Advertise

Must Read

1) महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

2) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस photo

3) 'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत

4) 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

5) आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..


-All Good PDF Scanner

-Mint Leaf Message-Your Private Message

-Unique Keyboard - Fancy Fonts & Free Emoticons

-Tangram App Lock

-Direct Messenger

-Private SMS

-One Sentence Translator - Multifunctional Translator

-Style Photo Collage

-Meticulous Scanner

-Desire Translate

-Talent Photo Editor - Blur focus

-Care Message

-Part Message

-Paper Doc Scanner

-Blue Scanner

-Hummingbird PDF Converter - Photo to PDF

-All Good PDF Scanner

यापैकी आपल्या फोनमध्ये जर कोणतंही अॅप असेल तर ते तातडीनं डिलीट करायला हवं. जोकर मालवेयर हा Android च्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक आहे. मालवेअर कालांतरानं वैयक्तीक अॅप्स तयार करून त्याचे पॉपअप देत असतो. महिन्याच्या सुरुवातीलाच साधारण 200,000 वेळा डाउनलोड झालेल्या अॅप्सद्वारे मोबाईल, संगणाकात हा व्हायरस शिरला होता.

Zcaler’s Viral Gandhi यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे हा व्हायरस SMS, डेटा आणि फोनमधली माहिती मिळवण्यासाठी खास डेव्हलप करण्यात आला आहे. हा व्हायरस फोन आणि लॅपटॉपमधील डेटा हॅक करून त्याचा गैरवापर किंवा फसवणूक करण्यासाठी वापरला जात आहे.