Main Featured

अजित पवारांनी दिली चुकांची कबुली

Ajit  Pawar

पुण्यात (Pune)कोरोना रुग्णांची संख्या वेगात वाढत आहे. त्याचबरोबर सोई-सुविधांवर ताण येत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात आज लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि अ‍ॅब्युलन्सची कमतरता आहे, काही चुका झाल्या आहेत अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit  Pawar) यांनी दिली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.


अजित पवार (Ajit  Pawar)म्हणाले,ऑक्सिजन सिलेंडर जेवढे पाहिजे तेवढे मिळत माहीत हे वस्तूस्थिती आहे. अ‍ॅब्युलन्सच्या तक्रारी मान्य आहेत. जम्बो वर अचानक जास्त पेशंट्सचा भार पडला. त्यामुळे व्यवस्था कोलमडली ही वस्तुस्थिती आहे.
Must Read

ऑक्सीजन तुटवडा प्रॉब्लेम झाला म्हणून जम्बोत पेशंट पाठवले. पुण्यात (Pune) लॉकडाऊन उठवण्यावरून सीएमची वेगळी भूमिका होती पण पुणातील व्यापारी आक्रमक होते. म्हणून लॉकडाऊन उठवलं अशी माहितीही त्यांनी दिली.
अनेक लोकप्रतिनिधी कोरोना बाधीत झालेत. साथ वाढतेय हे वास्तव. संख्या लाखावर गेली असली तरी 82 हजार कोरोना मुक्त हे पण सांगितलं गेलं पाहिजे. सरपंच व्हायचं म्हणून काही कार्यकर्ते टेस्ट देईना हा सोशल प्रॉब्लम हे त्याला वाटतं लोक निवडून देणार नाही. कोरोना लपवून ठेवतात. परीक्षा घेण्यावरून भिन्न मतं आहेत.