Main Featured

आरक्षण बदलल्यास तीव्र आंदोलन


 


शहरातील वाडॅ नं.21 मधील ज्योर्तिलिंग पान शॉप, आदर्श झोपडपट्टी आरक्षण जागेवर भाजी मार्केट, शॉपिंग सेंटर व वाहनतळ यासाठी आरक्षण केले असून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरक्षण बदलण्याचा विषय घेतला आहे. मात्र त्यास विरोध असून आरक्षण बदलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना युवा सेनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी, नगराध्यक्षा यांना दिला आहे.

दिलेल्या निवेदनात वार्ड नं.21 मधील जागेवर भाजी मार्केट, शॉपिंग सेंटर, वाहनतळ, वाढीव हद्द, कबनूर गट क्रं.70 पैकी या जागेवरील रेखांकन बिगर शेती आदेश याबाबी लक्षात घेऊन आरक्षण रद्द करणेबाबत पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय क्र.41(Intense agitation if reservation is changed) वर विषय घेण्यात आला आहे. सदरची जागा डेक्कन स्पिनिंग मिल समोर असून सध्या या रस्त्यावर बाजार भरतो. त्यामुळे अपघात होण्याची भिती व्यक्त केली जाते. तेव्हा सर्वसाधारण सभेत घेतलेल्या विषयास मान्यता देऊ नये. सदरचा ठराव रद्द करून या जागेवर भाजी मार्केट, शॉपिंग सेंटर व वाहनतळ यासाठी आरक्षण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Must Read

निवेदनावर युवा सेनेचे जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, शहर प्रमुख सयाजी चव्हाण अभिजीत लोले. अविनाश वासुदेव, सागर जाधव, खुशाल वाघेला, सचिन खोंद्रे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.