Main Featured

अर्जुर कपूर मागोमाग अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह


भारतभर पसरलेला कोरोना व्हायरसचा corona virus विळखा बॉलिवूडमध्येही पसरला आहे. अनेक सेलिब्रिटींना याची लागणही झाली आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने Arjun Kapoor रविवारी स्वत: तो कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. त्यानंतर आता, अर्जुन मागोमाग त्याची कथित प्रेयसी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराही Malaika Arora कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे. 

अर्जुन कपूरप्रमाणेच मलायकालाही कोरोनाची कोणतीही लक्षण आढळली नव्हती. मात्र तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर, मलायका होम क्वारंटाईनमध्ये आहे. मलायकाच्या 'इंडियाज बेस्ट डान्सर्स' या शोच्या सेटवरही 7 ते 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. 

मलायका नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबत असलेल्या नात्याबाबत, कधी तिच्या योगा, तर कधी ड्रेसिंगमुळे ती नेहमीच चर्चेत असते. लॉकडाऊनच्या काळातही मलायका अनेक फोटो, खाण्याचे पदार्थ पोस्ट करत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होती. 

दरम्यान, अर्जुन कपूरने रविवारी एका सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.अर्जुनही घरीच क्वारंटाईन असून, त्याच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अर्जुन त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. यावेळी अभिनेत्री नीना गुप्ता आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासोबत तो चित्रीकरण करत होता असं म्हटलं जात आहे. अर्जुनला कोरोनाची लागण झाल्याचं कळताच चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.