Main Featured

“किसिंग सीन न केल्यामुळे चित्रपटातून काढलं”

Sameera Reddy

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी  (Sameera Reddy)आपल्या मादक अदांसाठी प्रसिद्ध आहे. आजवर अनेक चित्रपटांमध्ये तिने इंटिमेट सीन्स केले आहेत. मात्र अशा दृश्यांना जर नकार दिला तर तुम्हाला चित्रपटांमधून बाहेर काढलं जातं, असा आश्चर्यचकित करणारा खुलासा समीराने केला आहे. “किसिंग सीन करण्यास नकार दिल्यामुळे एका चित्रपटातून मला बाहेर काढण्यात आलं (casting couch)होतं.” असा अनुभव समीराने सांगितला आहे.


आपल्या करिअरमधील एक चकित करणारा अनुभव सांगितला. “मी एका चित्रपटात काम करत होती. चित्रपटाचं शूटिंग २५ टक्के पुर्ण झालं होतं. दरम्यान अचानक दिग्दर्शकाने मला एका किसिंग सीन विषयी माहिती दिली. 

Must Read

मुळ स्क्रिप्टमध्ये तो सीन नव्हता परंतु अचानक निर्मात्यांच्या सांगण्यावरुन तो सीन वाढवण्यात आला. त्या किसिंग सीनचा पटकथेशी काहीही संबंध नव्हता, त्यामुळे मी थेट नकार दिला. त्यानंतर तो सीन करण्यासाठी विविध प्रकार माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम होते. अखेर निर्मात्यांनी मला चित्रपटातून बाहेर (casting couch) काढलं.” असा अनुभव समीराने सांगितला.
समीरा रेड्डी (Sameera Reddy) बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री आहे. २००२ साली ‘मैने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून तिनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘डरना मना है’, ‘प्लान’, ‘टॅक्सी नंबर९२११’, ‘नक्षा’, ‘फुल अँड फायनल’, ‘नो एंण्ट्री’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिनं काम केलं. ‘मुसाफिर’ या चित्रपटामुळे समीरा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. या चित्रपटामध्ये तिने केलेले इंडिमेट सीन्स त्यावेळी प्रचंड चर्चेत होते. हिंदीसोबतच तिने दाक्षिणात्य आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केलं आहे.