Main Featured

आनंदाची बातमी ! युवराज निवृत्ती मागे घेणार


                                yovraj singh


भारतीय संघाचा माजी डावखुरा ष्टपैलू खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh)ने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यासाठी तयारी दाखवली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी युवराज पंजाबकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास तयार झाला आहे. यासंदर्भात युवराजने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्याकडे रितसर परवानगी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब (Retirement decision back)क्रिकेट असोसिएशनने युवराजला पंजाबच्या संघाचा मेंटॉर कम खेळाडू अशी ऑफर दिली होती. पंजाब संघामधील तरुण खेळाडूंना युवराजच्या अनुभवाचा फायदा होईल असं काही अधिकाऱ्यांचं मत होतं. पंजाब क्रिकेट असोसिएशनची ही ऑफर युवराजने स्विकारलेली आहे.

“मी खरंतर स्थानिक क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती, पण मला क्रिकेट खेळायचं होतं यासाठी बाहेरील देशातील लिगमध्ये खेळण्यासाठी मी बीसीसीआयची परवानगी मागितली होती. पंजाब क्रिकेट असोसिएशनने केलेली विनंती मी नाकारु शकत (schedule of indian premier league) नाही, म्हणून मी यावर सुमारे ३-४ आठवडे विचार केला. सरतेशेवटी मला पुनरागमन करण्याचा निर्णय योग्य वाटला.” युवराज Cricbuzz ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

Must Read

बीसीसीआयने युवराजला पुन्हा खेळण्याची परवानगी दिल्यास, तो पंजाब संघाकडून फक्त टी-२० क्रिकेट खेळेल. इतर स्पर्धांमध्ये मला सहभागी होता येणार नसल्याचंही युवराजने स्पष्ट केलंय. पंजाबच्या संघाला पुन्हा एकदा जुने दिवस दाखवून विजेतेपद मिळवून द्यायचं हे माझं ध्येय आहे. मी आणि हरभजन एकत्र खेळत असताना आम्ही हे करुन दाखवलं होतं, पण यानंतर तो योग जुळून येत नाहीये. यासाठी पुनरागमनाचा निर्णय घेतल्याचं युवराजने सांगितलं.(schedule of indian premier league)