Main Featured

डेबिट वा क्रेडिट कार्ड वापरताय?


Use-a-debit-or-credit-card

डेबिट वा क्रेडिट कार्डचा
 
Of debit or credit card वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. उच्चभ्रू वर्गाची मक्तेदारी मोडत आता ही कार्डे सर्वसामान्यांकडे दिसू लागली आहेत. पण त्याचबरोबर गैरव्यवहारांचे प्रमाणही वाढत आहे. याला आळा घालण्याच्या उद्देशाने; तसेच कार्डांचा वापर आणखी सुलभ व्हावा म्हणून काही बदल करण्यात आले आहेत. कार्डधारकाने नवे नियम समजून घेणे गरजेचे असून, येत्या ३० सप्टेंबरपासून हे नियम लागू होणार आहेत.

नवे कार्ड देताना किंवा आधीच्या कार्डचे नूतनीकरण करताना संबंधित कार्ड कंपनीने अथवा बॅंकेने फक्त देशांतर्गत आर्थिक व्यवहारांसाठी हे कार्ड द्यावे, अशी सूचना रिझर्व्ह बॅंकेने केली आहे. याचा वापर ‘एटीएम’मधून रोख रक्कम काढणे किंवा ‘पॉस’ मशीनवर पेमेंट करण्यासाठी वापरता येईल, असे अपेक्षित आहे. 

कार्डधारकास ऑनलाइन देय, संपर्करहित देय द्यायचे असल्यास; तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहार करायचे असल्यास तशी सुविधा संबंधित कार्डधारकाने आपल्या कार्डावर स्वतंत्रपणे कार्यान्वित करून घेणे आवश्‍यक आहे. 

सध्या चालू असलेल्या कार्डावरील या सुविधा आहेत त्या तशाच चालू ठेवायच्या की, बंद करायच्या, याचा निर्णय संबंधित बॅंक किंवा कार्ड कंपनीने कार्डधारकाची जोखीम विचारात घेऊन करायचा आहे. मात्र, सध्याच्या कार्डचा वापर वरील सुविधांसाठी अद्याप झाला नसेल, तर या सुविधा खंडीत करायच्या आहेत. 

कार्डधारकाला आपल्या व्यवहारांची कमाल मर्यादा ठेवता येणार आहे. यामध्ये आपल्या गरजेनुसार बदल करता येणार आहेत. क्रेडिट कार्डच्या बाबतीत असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त कमाल मर्यादा ठेवता येणार नाही. तसेच, आपले कार्ड ‘स्विच ऑन’ व ‘स्विच ऑफ’सुद्धा करता येणार आहे. हे बदल कार्डधारकास मोबाईल ॲप, इंटरनेट बॅंकिंग किंवा आयव्हीआर (इंटरॲक्‍टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स) माध्यमातून करता येतील.