Main Featured

CM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने


Uddhav-Thackeray's-decision-won-hearts

उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करून वाहनधारकांची गैरसोय टाळावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांनी एमएमआरडीएला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशाने मुंबई-नाशिक महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची कोंडीतून सुटका होणार आहे.

Advertise

मुंबई-नाशिक महामार्गावर माणकोली येथील उड्डाणपुलाच्या ठाणे दिशेकडील डाव्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांच्या हस्ते आज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच इतर लोकप्रतिनिधी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत दुपारी दीड वाजता हे लोकार्पण ठरले होते. त्याप्रमाणे एमएमआरडीएने आवश्यक ती तयारीही केली होती. मात्र पहाटे भिवंडी येथे इमारत दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी भिवंडी येथे धाव घेतली व मदतकार्य वेगाने सुरू झाले, त्यानंतर हा लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी एकंदर स्थिति लक्षात घेऊन तातडीने पुढील निर्देश एमएमआरडीएला दिले. केवळ अधिकृत उदघाटन झाले नाही म्हणून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवणे आणि वाहनधारकांची गैरसोय करणे बरोबर नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला उद्घाटनाची वाट न पाहता पुलाची मार्गिका खुली करून वाहतूक सुरू करण्यास सांगितले. या निर्णया खूप मोठा दिलासा वाहनधारकांना मिळाला आहे.

दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावर होणारी कोंडी ही नेहमीचीच डोकेदुखी आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी माणकोली येथील उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन या उड्डाणपुलाची वाहतुकीसाठी सज्ज झालेली मार्गिका तातडीने खुली करण्यास मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य दिले. उद्घाटन सोहळ्याला बगल देत त्यांनी हे पाऊल उचलले. या निर्णयाचे भिवंडी, ठाणेकर तसेच या मार्गावरून मुंबई-नाशिक असा प्रवास करणाऱ्या सर्वांकडूनच स्वागत केलं जात आहे.