UC-Browser-got-indigenous-options

काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारनं central government चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भारतातील लाखो युझर्स वापरत असलेल्या ‘युसी ब्राऊझर’ या अ‍ॅपचाही समावेश होता.

Advertise

पंतप्रधान नरेंद्र मोदी 
Prime Minister Narendra Modi यांच्या आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत टाटा कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्यानं पंतप्रधानांच्याच कार्यक्षेत्रात म्हणजेच बनारसमध्ये स्वदेशी ब्राऊझर ‘आयसी ब्राऊझर’ लाँच केला.

आश्चर्याची बाब म्हणजे ‘आयसी ब्राऊझर’ लाँच केल्यानंतर काही तासांच्या आतच ते ४ लाखांपेक्षा अधिक युझर्सकडून डाउनलोडही करण्यात आलं. ‘आयसी ब्राऊझर’कडे चिनी ‘युसी ब्राऊझर’चा स्वदेशी पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. टीसीएसचे माजी कर्मचारी अर्पित सेठ यांनी हे ‘आयसी ब्राऊझर’ तयार केले आहेत. दरम्यान, या अ‍ॅपचा सर्व्हर भारतातच असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा डेटा लिक होण्याचा प्रश्नच नसल्याचं सांगण्यात येत आहे.

“चिनी अ‍ॅप्सकडून भारतातील डेटा चोरी रोखण्यासाठी आम्ही आयसी ब्राऊझर तयार केला आहे. याचा सर्व्हर भारतातच असल्यामुळे डेटा लिक होण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. परंतु अ‍ॅप लाँच केल्यावर अर्ध्या तासाच्याआतच ४ लाखांपेक्षा अधिक जणांनी हा ब्राऊझर डाउनलोड करणं ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे,” अशी प्रतिक्रिया अर्पित सेठ यांनी दिली. हे ब्राऊझर कोणत्याही प्रकारचा डेटा स्टोअर करून ठेवत नसल्यानं डेटा आणि अन्य माहिती लीक होण्याची शक्यता नाही. तसंच या ब्राऊझरची विशेष बाब म्हणजे याचा वापर केल्यानंतर हे अ‍ॅप स्वत:च हिस्ट्री डिलीट करतं. तसंच यामध्ये एक शॉर्ड व्हिडीओ फिचरही देण्यात आलं आहे. तसंच याच्या माध्यमातून खरेदी करणंही शक्य आहे.