Main Featured

मटका प्रकरणी तिघांवर गुन्हा : दोघांना अटक


                             This Janmashtami, Gujarati obsession with Teen Patti spills over online 

इचलकरंजी शहापूर पोलिसांनी विविध दोन ठिकाणी छापे टाकून मटका घेणार्‍या तिघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 2200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा 

1) इचलकरंजीत "या' संघटना आक्रमक, केली जोरदार निदर्शने

2) कोल्हापूरकरांची चिंता वाढली

3) काय आहे कोल्हापुराच्या जनता कर्फ्युची परिस्थिती

4) कोल्हापूरात तरुणाचा निर्घृण खून

5) सांगलीत जनता कर्फ्यूचा उडाला बोजवारा

शहापूर पोलिसांनी आज दुपारच्या सुमारास चांगदेव पाटील चौकात मटका घेत असताना अरुण विष्णु शिंदे (वय 40, रा. चांगदेव पाटील चौक) याला अटक केली. त्याच्याकडून 1100 रुपये रोख व मटक्याचे साहित्य जप्त केले. तर गणेशनगर येथे केलेल्या दुसर्‍या कारवाईत प्रकाश विठ्ठल चिनमुरे (वय 52, रा. पुरोहित प्लाझासमोर, गणेशनगर) याला ताब्यात घेऊन 1100 रुपये व मटक्याचे साहित्य जप्त केले. या दोन्ही कारवाईत शिंदे आणि चिनमुरे या दोघांना अटक केली असून सनी रघुनाथ सुतार (वय 30, रा. इचलकरंजी) हा फरार आहे.