Main Featured

IPL मध्ये होणार मोठा बदल! असे असतील 8 नियम


There-will-be-a-big-change-in-the-IPL

आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मार्चमध्ये होणारी ही स्पर्धा आता कोरोनामुळे भारताबाहेर युएइमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात होणार आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत असणाऱ्या या स्पर्धेत अनेक कडक नियम लागू करण्यात आले आहेत. कोरोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा प्रक्षेकांशिवाय आयोजित करण्यात आली आहे. मात्र यंदा आयपीएलमध्ये 6 नियम असणार आहेत.

1. रिकामे स्टेडियम

कोरोनाव्हायरस हा एका माणसकडून दुसऱ्याकडे लगेच पसरला जातो. त्यामुळेच आयपीएल सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजेच स्टेडियमवर प्रेक्षक नसतील. हा निर्णय कोरोनाचे संक्रमण होऊ नये या दृष्टीने घेण्यात आला आहे.

2. ठिकठिकाणी सॅनिटायझर

दुसरा मोठा बदल म्हणजे स्टेडियमवर ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. जेथे वेळोवेळी खेळाडू आपल्या हात सॅनिटाइज करतील. खेळाडूंना सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे.

3. चेंडूवर नाही लावता येणार थूक

क्रिकेटमधला सगळ्यात मोठा बदल म्हणजे गोलंदाजानं चेंडू चमकवण्यासाठी आता थूक लावता येणार नाही. जर खेळाडू असे करतील तर त्यांना ताकीद देण्यात येईल. सतत असे झाल्यास खेळाडूंना दंडही भरावा लागेल. खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी आपल्या घामाचा वापर करू शकतात.

4. कोरोना सबस्टिट्युट

वर्ल्ड कप 2019मध्ये आयसीसीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. यात कोणताही खेळाडू सामना सुरू असताना जखमी झाल्यास, त्याच्या जागी दुसरा खेळाडू सामना खेळू शकतो. मात्र आता कोरोनामुळं या नियमात थोडा बदल करण्यात आला आहे. जर खेळाडूमध्ये कोणताही लक्षणं दिसली तर, त्याच्या जागी लगेचच दुसरा खेळाडू मैदानात उतरेल.

5. थर्ड अम्पायर नो बॉल

पहिल्यांदाच आयपीएलमध्ये नो बॉलचा नियम असणार आहे. आता सामन्यात फ्रंटफूट नो बॉल फील्ड अम्पायरच्या जागी थर्ड अम्पायर देतील. गेल्या वर्षी झालेल्या भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेत या नियमाचे ट्रायल करण्यात आले होते.

6. 53 दिवसांनी असणार स्पर्धा

यंदा कोरोनामुळे ही स्पर्धआ 53 दिवसांसाठी असणार आहे. म्हणजे गेल्या 2 हंगामापेक्षा 3 दिवस जास्त

7. डबल हेडर

यावर्षी आयपीएलमध्ये 10 दिवस डबल हेडर सामने असणार आहेत. म्हणजे एकाच दिवशी दोन सामने असतील.

8. मॅच टाइम

यावेळी सामन्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. यावेळी सामने 7.30 वाजता सुरू होणार आहेत. याआधी सामने 8 वाजता सुरू होत होते.