Main Featured

कोल्हापूरकरांची चिंता वाढली

kolhapur corona positive


Kolhapur News- जिल्ह्यातील वाढत्या मृत्यू संख्येमुळे कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 27 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी कोरोनामुळे बळी पडलेल्यांचा आकडा 1 हजाराच्या पुढे सरकला. जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या 1,004 झाली आहे. दिवसभरात 873 नवे बाधित रुग्ण आढळले आहेत.


तर शहरात 288 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. आजतागायत बाधित असलेल्या 32 हजार 890 रुग्णांपैकी 20 हजार 739 व्यक्तींनी कोरोनावर (coronavirus)मात केली आहे. सध्या 12 हजार 142 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधित आणि मृत्यूंच्या संख्येत भर पडत आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांनी एकूण 10 हजारांचा टप्पा पार केला आहे.


Must Read


कंगनाने शेअर केला बाळासाहेबांचा जुना VIDEO,म्हणाली......


राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच, पुन्हा एकदा सर्वोच्च संख्या


मृतांत कोल्हापूर शहर 6, हातकणंगले 6, शिरोळ 8, करवीर 3, पन्हाळा, कागल तालुक्यात प्रत्येकी 1, तर सांगली व कर्नाटक राज्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.जिल्ह्यातील नव्याने 1,551 नागरिकांची कोरोनाची प्राथमिक तपासणी झाली. आरटी-पीसीआर, सीबीनॅटसाठी 1,701, अँटिजेन तपासणीसाठी 599 व्यक्तींचे स्वॅब घेतले आहेत.

गुरुवारी सकाळी 10.45 वाजता हातकणंगले येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. सकाळी 11 वाजता 43 नव्या बाधितांची भर पडली. यात शहरात 24, करवीर 6, हातकणंगले 4, गडहिंग्लज 6, गगनबावडा, चंदगड, शाहूवाडी तालुक्यात प्रत्येकी एक, तर अन्य जिल्ह्यातील 3 जणांचा समावेश आहे. सकाळी 11.15 वाजता करवीर 5, गडहिंग्लज 3, हातकणंगले व शहरात प्रत्येकी 1 बाधित व्यक्ती आढळली आहे.

सायंकाळी 7.30 वाजता आणखी 26 बाधितांची भर पडली. यामध्ये हातकणंगले 11, शहर, करवीर तालुक्यात प्रत्येकी 6, पन्हाळा 2, तर राधानगरीतील 1 व्यक्तीचा समावेश आहे. रात्री 8 वाजता 35 बाधितांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात हातकणंगले व शिरोळ प्रत्येकी 10, करवीर 9, कागल, राधानगरी, अन्य जिल्ह्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. रात्री 8.30 वाजता शहर 3, करवीर 1, शाहूवाडी 10, कागल 28, शिरोळ 1, गडहिंग्लजमध्ये 1 व्यक्ती कोरोनाबाधित आढळली आहे.