The-cricketer-is-preparing-to-go-to-Pakistan

cricket
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (PCB)
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचे माजी कसोची फलंदाज आणि झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक लालचंद राजपूत पुढच्या महिन्यात पाकिस्तानला जाणार आहे. यासाठी त्यांना व्हिसाही देण्यात येणार आहे.

पुढच्या महिन्यात पाक विरुद्ध झिम्बाब्वे यांच्याच मालिका होणार आहे. यासाठी राजपूत यांनी व्हिसाची मागणी केली होती. झिम्बाब्वे क्रिकेट संघाला व्हिसा देण्यात येणार असल्याने झिम्बाब्वे क्रिकेटचे अधिकारी आणि संघातील अधिकाऱ्याची नावंही यादीत आहे. पीसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपूत यांना व्हिसा देण्यात कोणतीही अडचण येणार नाही. 2008मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं एकही पाकिस्तानचा दौरा केला नाही आहे. 

दोन्ही देशांमध्ये सध्या तणावपूर्व वातावरण आहे.झिम्बाब्वे क्रिकेट युनिव्हर्सचे चेअरमन तावेंग्वा मुकुलानी यांनी जिओ सुपर चॅनलला सांगितले की लालचंद राजपूत हे त्यांचे प्रशिक्षक आहेत आणि मालिकेसाठी त्यांनी पाकिस्तानला भेट द्यावी अशी त्यांची इच्छा आहे. या दौर्‍यामध्ये झिम्बाब्वेचा संघ तीन एकदिवसीय सामने आणि 3 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.