Main Featured

भाज्यांनंतर डाळींच्या दरातही वाढ; हे आहे कारण

The-budget-of-the-common-man-will-collapse

कोरोनाच्या
corona
संकटात याआधीच सर्वसामान्यांचे हाल होत आहे. त्यात गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. आता सर्वसामन्यांना आणखी जळ बसण्याची शक्यता आहे, कारण आता भारतात डाळींचे दरही (Pulses Price in India) वाढू लागले आहेत. दिल्लीसह अनेक बड्या शहरांमध्ये डाळींच्या भावात 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी हरभरा डाळीची किंमत 70-80 रुपये प्रति किलो होती, परंतु यावेळी ती शंभर रुपयांच्या पुढे गेली आहे. तूरडाळ 115 रुपये प्रति किलोला विकली जात आहे. पुरवठा वाढविण्यासाठी नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशनने (नाफेड) व्यापाऱ्यांना स्टॉक रिलीज करण्याची मागणी केली आहे. सध्या डाळींचा पुरवठा कमी झाला आहे तर, मागणी सातत्याने वाढत आहे. म्हणून व्यापाऱ्यांनी 2020-21 पर्यंत आयात कोटा देण्याची मागणी केली आहे. मात्र, पुरवठ्याची परिस्थिती चांगली असल्याचे सरकारचे मत आहे आणि पुढील तीन महिन्यांत खरीप हंगामातील पीक बाजारात येण्यास सुरवात होईल.

दरम्यान, अलीकडेच कृषी आयुक्त एस.के. मल्होत्रा ​​यांनी भारतीय डाळी व धान्य असोसिएशनच्या (आयपीजीए) वतीने आयोजित वेबिनारमध्ये सांगितले होते की खरीप हंगामात डाळींचे एकूण उत्पादन 93 लाख टन होईल अशी भारताला अपेक्षा आहे. मागील वर्षी तूरडाळीचे उत्पादन 38.3 लाख टन झाले होते, यावेळी हेच उत्पादन 40 लाख होऊ शकते.

का वाढत आहे डाळींचे दर?

व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊन काळात तूरडाळीचे दर प्रति किलो 90 रुपयांनी वाढले आणि नंतर ते 82 रुपये प्रति किलोवर गेले. आता किंमत पुन्हा वाढण्यास सुरवात झाली आहे. मात्र आता सणासुदीच्या काळात डाळींची मागणी वाढली आहे. अतिवृष्टीमुळे कर्नाटकातील तूरडाळीचे पिकाचे नुकसान होईल, अशी भीती व्यापाऱ्यांना आहे. यामुळे उत्पन्नामध्ये 10% तोटा होऊ शकतो. 2010-21 साठी कडधान्याच्या आयातदारांनी तूर आयात इम्पोर्ट कोटा जाहीर करावा अशी मागणी केली आहे. एप्रिलमध्ये सरकारने 4 लाख टन तूर आयात कोटा जाहीर केला, जो अद्याप वाटप झालेला नाही. यापैकी 2 लाख टन तूर मोझांबिकहून येणार होती. त्यामुळे देशात डाळींच्या किंमती वाढत आहेत.