Main Featured

अन्नातून विष घालून खून केल्याच संशय
कबनूर येथील मृत्यू झालेल्या अश्‍विनी अधिक टकले या विवाहितेचा घातपात झाला असून अन्नातून विष घालून तिचा खून केल्याची दाट शक्यता असून त्यादृष्टीने या घटनेची सखोल चौकशी करावी. तसेच या प्रकरणातील संशयित सासू सुलोचना टकले हिला तात्काळ अटक करावी, अशी मागणी विवाहितेच्या नातेवाईकांसह भागातील नागरिक आणि भिमशक्ती सामाजिक संघटना यांच्यावतीने निवेदनाद्वारे पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार यांच्याकडे केली आहे.

Must Read

कबूनरातील इंदिरानगर येथे राहणार्‍या अधिक टकले याची पत्नी अश्‍विनी (वय 30) हिने विषारी औषध प्राशन केल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. माहेरहून घर बांधण्यासाठी पैसे न आणल्याने अश्‍विनी हिचा छळ करुन तिला आत्महत्येत प्रवृत्त केलेप्रकरणी वडीलांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी पती अधिक टकले, सासू सुलोचना टकले, सासरा महादेव टकले या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पती व सासरे यांना अटक करण्यात आली आहे. तर सासू फरारी आहे.