Speed-boat-running-smoothly-on-the-highway

अनेकदा नदी किंवा समुद्राची Sea सफर करताना आपण स्पीड बोट पाहातो. पण हीच स्पीड बोट अचानक समुद्र-नदी सोडून रस्त्यावर धावली तर पाहून हैराण व्हायला होईल असाच एक अजब व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही स्पीड बोट पाण्याएवढीच सुसाट हायवेवरही धावताना दिसली आणि रस्त्यावरील प्रवाशांच्या भुवया एकदम उंचावल्या आहेत.

Advertise

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की एक स्पीड बोट सुसाट वेळानं जात आहे. याचं डिझाइन बोटीसारखं आणि खाली चाक असलेली ही बोटवजा कार वेगानं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना नक्की ही बोट आणि की कार हा प्रश्न पडला. या गाडीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.


आतापर्यंत हा व्हिडीओ 11 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. @TheoShantonas नावाच्या युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. बोटच्या आकारात ही खास कार तयार करण्यात आली आहे. ही कार पहिल्यांदा पाहताना स्पीड बोट वाटते मात्र नंतर ही खास कार तयार करून घेतल्याचं लक्षात येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हा फ्लोरिडामधील असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.

हा व्हिडीओ पाहून अनेक युझर्स संभ्रमात पडले. पाण्यावर चालणारी स्पीड बोट रस्त्यावर कशी पळते असंही म्हटलं आहे तर काहींना ही संकल्पना खूप आवडल्याचंही दिसत आहे. सोशल मीडियावर ही संकल्पना खूप आवडली असून हा व्हिडीओ युझर्सनी खूप शेअर केला आहे.