Main Featured

सांगली बनले कोरोना हॉटस्पॉट

coronavirus


Sangli- कोरोनाचा जिल्ह्यात (coronavirus)उद्रेक झाला आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात तर रुग्ण आणि मृत्यूदरही एकूण संख्येच्या एकूण 51 टक्केवर पोहोचला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्र हॉटस्पॉटपेक्षा पुढे डेंजर झोनच बनले आहे. एकीकडे उपचाराची यंत्रणा तोकडी पडत आहे, तर दुसरीकडे सुरक्षा, खबरदारीचे नियम धाब्यावर बसवत खुलेआम गर्दीचा महापूर आहे. त्यामुळे आता कोरोना आणि गर्दीला बे्रेक लावण्यासाठी अन्य उपचाराबरोबरच पुन्हा एकदा लॉकडाऊनची गरज आहे. 


इस्लामपूर (Islampur), आष्ट्यासह अन्य शहरात जनता कर्फ्यू लावला जात आहे.त्याच पद्धतीने मनपा क्षेत्रात आठ-दहा दिवसांचा शंभर टक्के लॉकडाऊनची गरज जनतेतूनच व्यक्त होत आहे.Must Read


Sangli जिल्ह्यात मार्च महिन्यात इस्लामपुरातून कोरोनाचा शिरकाव झाला.त्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन, संचारबंदी जाहीर करण्यापूर्वी महापालिका क्षेत्रात आयुक्त नितीन कापडनीस यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा, हातगाडे, फेरीवाल्यांपासून सर्वच व्यवसाय बंद केले होते. त्याचा परिणाम म्हणून शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नव्हता.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर बाहेर गाव, परगाव तसेच परदेशातून येणार्‍यांवरही वॉच ठेवण्यात आला. जिल्हा, पोलिस, महापालिका, आरोग्य विभागामार्फत यासाठी शहरात होम क्वारंटाईन, इन्स्टिट्यूट क्वारंटाईन तसेच मिरज सिव्हीलमध्ये कोरोना हॉस्पिटलमध्ये (coronavirus) उपचाराची यंत्रणा उभारण्यात आली. त्यामुळे जरी बाहेरून येणार्‍यांमुळे कोरोनाचे रुग्ण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आढळून आले तरी शहरात हे प्रमाण कमी होते. पण जुलै, ऑगस्टपासून लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल होऊन बाजारपेठा खुल्या झाल्या, तसे शहरातही कोरोनाचे प्रमाण वाढू लागले. आता तर त्याचा उद्रेक झाला आहे. सुरुवातीला दोन-अडीचशे रुग्ण सापडले तर त्यात पन्नासभर शहरातील असत. पण आता सातशे, आठशेवर आकडा पोहोचला आहे. त्यात पाचशेपेक्षा अधिक रुग्णसंख्या ही महापालिका क्षेत्रात आहे. 

आजअखेर एकूण 15650 रुग्णसंख्येपैकी शहरातील 7838 म्हणजे तब्बल 51 टक्केपेक्षा रुग्ण शहरातील आहेत. एकूण 597 मृत्यूपैकी 284 मृत्यू हे शहरातीलच आहेत. आता रुग्णसंख्या वाढू लागल्याने हॉस्पिटल्सची यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. हॉस्पिटल्सची संख्या वाढली तरी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, डॉक्टर, नर्सची यंत्रणा अपुरी पडत आहे. रुग्णांची फरफट सुरू आहे. मात्र रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी, खबरदारीचाही विषय राहिलेला नाही. त्यामुळे खुलेआम संसर्गाचा प्रसार सुरूच आहे. सर्व कार्यालये, बाजारपेठा यादृष्टीने कोरोना प्रसाराचे अड्डेच बनले आहेत. त्याला ब्रेक लावण्यासाठी आता इस्लामपूर, आष्टा, कडेगावसह अन्य शहरांप्रमाणे मनपा क्षेत्रातही लॉकडाऊनची गरज जनतेतून व्यक्त आहे.