Main Featured

घरफोडीतील दागिने विक्रीसाठी आलेले दोघे जेरबंदThe two who came to sell the jewelery in the burglary were arrested

इचलकरंजी येथे जयसिंगपूर परिसरात घरफोडीतील दागिने विक्रीसाठी आलेल्या दोघा चोरट्यांना इचलकरंजीतील स्थानिक गुन्हे शाखा व कोडोली पोलिसांच्या पथकाने अटक केली. संतोष सिध्दू पुजारी (वय 35 रा. वडणगे ता. करवीर) व राहुल उत्तम देवकर (वय 24 रा. मांगले ता. शिराळा) अशी त्यांची नांवे आहेत. त्यांच्याकडून 243 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व अन्य मुद्देमाल असा 9 लाख 78 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये कोडोली परिसरातील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

Advertise

Must Read

1) महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

2) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस photo

3) 'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत

4) 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

5) आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विविध गुन्ह्यांच्या अनुषंगांने तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखाचे पथक गस्त घालत असताना सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास जाधव यांना चौंडेश्‍वरी सूत गिरणी ते शिरोळ या रोडवर दोघेजण दोन मोटरसायकलीवरुन चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहकार्‍यांसह कोल्हापूर-जयसिंगपूर रोडवरील चौंडेश्‍वरी सूत गिरणी ते शिरोळ या रोडवर छापा टाकला असता त्याठिकाणी दोघेजण टिव्हीएस ज्युपिटर व स्प्लेंडर मोटरसायकलवर असल्याचे मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कोडोली परिसरात दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. 

त्यांची अंगझडती घेता त्यांच्याकडे 97 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच घरफोडीचे साहित्य, दोन मोटरसायकली व दोन मोबाईल असा 4 लाख 62 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. दोघांकडे पोलिस कोठडी दरम्यान केलेल्या चौकशीत त्यांच्याकडून उर्वरीत मुद्देमालही हस्तगत करुन एकूण 243 ग्रॅम वजनाचे दागिने व इतर साहित्य मिळून 9 लाख 78 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हे दोघेही सराईत चोरटे असून यातील संतोष पुजारी याच्यावर यापूर्वी दरोडा, घरफोडी चोरी, वाहन चोरी असे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास कोडोलीचे पोउनि नरेंद्र पाटील करत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विकास जाधव, कोडोली ठाण्याचे सपोनि सुरज बनसोडे,  नरेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार खंडेराव कोळी, पोलिस हवालदार संभाजी भोसले, राजीव शिंदे, शहनाज कनवाडे, रणजित पाटील, प्रशांत कांबळे, बालाजी पाटील, रविराज कोळी, संजय इंगवले, फिरोज बेग, महेश खोत, अमर शिरढोणे, आयुब गडकरी, सुरज चव्हाण, अजिंक्य घाटगे, संदीप मळघणे, कोडोली पोलिस ठाण्याचे विश्‍वास चिले, संभाजी खताळ आदींच्या पथकाने केली.