Main Featured

कुणासोबत झाल अभिनेत्री पूनम पांडेच लग्न ?


                              poonam panday got married

 मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) आपल्या बोल्डनेस मुळे बर्‍याचदा चर्चेत राहते, तिनं नुकतंच लग्न केलं आहे. होय, पूनमने तिचा प्रियकर सॅमशी लग्न केलं आहे. या अभिनेत्रीने सॅमशी लग्न केल्याचा खुलासा तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर केला आहे. तिनं इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती वधूच्या ड्रेसमध्ये दिसली आहे. पूनमच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

लग्नाच्या या खास प्रसंगी पूनम आणि सॅमने एकाच रंगाचे कपडे घातले होते. पूनमने नेव्ही ब्लू कलरचा लेहेंगा घातला असून त्यावर गुलाबी आणि पांढर्‍या रंगाने भरतकाम(Actress Poonam Pandey got married) केलं आहे, तर सॅमने निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. फोटो शेअर करण्याबरोबर पूनमने लिहिलं की, ‘मला पुढील सात जन्म तुझ्यासोबत घालवायचे आहेत’. पूनम आणि तिच्या लग्नाच्या फोटोवर टिप्पणी देताना सॅमने लिहिले की, ‘एब्सोल्युटली मिसेस बॉम्बे’.

सॅमने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यात पूनम एका फोटोमध्ये त्याला मेहंदी दाखवताना दिसत आहे, तर दुसर्‍या फोटोमध्ये ती ब्राइडल लूकमध्ये (Actress Poonam Pandey got married)दिसली आहे.

Must Read


कंगनाने शेअर केला बाळासाहेबांचा जुना VIDEO,म्हणाली......


राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच, पुन्हा एकदा सर्वोच्च संख्या


सॅम आणि पूनमचे ​​संबंध आधीपासून सर्वांचा माहित होते. दोघे अनेकदा एकत्र दिसतात, पूनम नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सॅमबरोबर इन्स्टाग्रामवर शेअर करते. फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री खूपच बोल्ड दिसत आहे.

पूनमच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर ती तिच्या चित्रपटांमधून जास्त खास काही दाखवू शकली नाही पण तिच्या बोल्डनेस मुळे ती नेहमीच खूप चर्चेत असते.