Main Featured

शारीरिक व मानसिक छळासह विवाहितेला बेदम मारहाण


 

Physical and mental abuse

इचलकरंजी येथे जेसीबी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत यासाठी शारीरिक व मानसिक छळा (Physical and mental abuse) सह विवाहितेला बेदम मारहाण केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात पतीसह पाचजणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.   पती इम्रान रफिकअहमद द्राक्षी, सासू सौ. जायदा रफिकअहमद द्राक्षी, सासरा रफिकअहमद जाफरसाब द्राक्षी, दीर सर्फराज रफिकअहमद द्राक्षी व नणंत आस्मा हफीजहुसेन सातारकर (सर्व रा. विजापूर) अशी त्यांची नांवे आहेत. या प्रकरणी सौ. आयेशा इमरान द्राक्षी (वय 26 रा. विजापूर सध्या लक्ष्मीनगर तारदाळ) हिने फिर्याद दिली आहे.

Advertise

Must Read

1) महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

2) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस photo

3) 'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत

4) 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

5) आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विजापूर येथील इमरान द्राक्षी आणि तारदाळ येथील आयेशा यांचा विवाह यांचा सन 2013 मध्ये विवाह झाला आहे. परंतु विवाहाच्या काही महिन्यानंतरच सासरच्या मंडळींकडून आयेशा हिचा विविध कारणांनी छळ सुरु झाला. तिचा शारीरिक व मानसिक छळ करत माहेरहून जेसीबी घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत यासाठी घरातून हाकलून दिले. पैसे न आणल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.