Main Featured

पंचगंगा नदी घाट परिसर स्वच्छता : स्वामी समर्थ सेवा केंद्र


                                             Panchganga River 

इचलकरंजी येथे केवळ अध्यात्मिक क्षेत्रातच नाही सामाजिक क्षेत्रात सुद्धा  मार्गाने आपले कार्य अविरत सुरू ठेवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता अभियाना अंतर्गत रविवारी येथील पंचगंगा नदी घाट परिसर स्वच्छता करण्यासाठी सेवा केंद्रातील सेवेकार्‍यांनी सेवा बजावली.

Must Read


संपूर्ण देशभरात विविध सेवा केंद्राच्या माध्यमातून विनामुल्य अध्यात्मिक सेवा सुरू असतात. कोविड आणि महापुराच्या संकटात देखील सेवा केंद्राच्या माध्यातून विविध स्तरातून मदत कार्य करण्यात आले. पंचगंगा नदीला नुकताच महापुर येऊन गेल्याने घाट परिसरात अस्वच्छता आणि चिखलाचे साम्राज्य झाले आहे. रविवार सकाळी सेवा केंद्रातील सेवेकर्‍यांनी नदी घाट परिसरातील कचरा, प्लास्टिक आणि माती एकत्र करून घाट स्वच्छ केला. या कार्यात स्वामी समर्थ सेवा केंद्रातील युवक-युवती सहभागी झाले होते.