Main Featured

शहरात नॉनकोविड रुग्णालय सुरू करावे : माणुसकी फौंडेशन


 


इचलकरंजी येथे सध्या सर्वत्रच कोरोनाचा प्रार्दुभाव व त्यावरील उपचार सुरु असल्याने नॉनकोविड रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे इचलकरंजी शहरात नॉनकोविड रुग्णालय सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन माणुसकी फौंडेशनच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना देण्यात आले.

मागील सहा महिन्यांपासून कोरोनाचे संकट ओढवल्याने येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय  हे कोविड अलगीकरण केंद्र करण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरातील खाजगी रुग्णालयातही 80 टक्के बेड कोविड बाधितांसाठी आरक्षित केल्यामुळे नॉनकोविड रुग्णांना उपचारासाठी वणवण करावी लागत आहे. त्यांना उपचार वेळत मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यापेक्षा गर्भवती महिलांना तसेच अपघातातील जखमींना वेळेवर उपचार मिळत नसल्याने परिस्थिती गंभीर बनतच चालली आहे. 

Must Read

1) महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

2) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस photo

3) 'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत

4) 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

5) आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..

त्यामुळे शहरात नॉनकोविड रुग्णालय सुरु करावे यासाठी फौंडेशनचे अध्यक्ष रवि जावळे यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांची भेट घेतली. सामाजिक कार्य करताना या संदर्भात सातत्याने तक्रारी एैकावयास मिळत आहेत. त्यामुळे शहरात नॉनकोविड रुग्णालय सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. किंवा आरक्षित केलेल्या रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांवर शासकीय दरात उपचार करण्याची सुविधा करुन द्यावी, अशी मागणी केली.

यावेळ प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून आरक्षित रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांवर उपचार बंधनकारक करावेत आणि उपचार न करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावे, असे आदेश दिले. शिष्टमंडळात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवि जावळे, अजित पाटील, आकाश नरुटे, कृष्ण इंगळे, आनंदा इंगवले, मनिष जाधव, अक्रम मुजावर, इम्रान शेख, रफिक रॉय यांचा समावेश होता.