Main Featured

नगरपरिषदेमध्येच सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला
इचलकरंजी येथे कोरोना (corona virus) च्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन करणार्‍या नगरपरिषद प्रशासनकडूनच या नियमाला हरताळ फासण्यात आला. तब्बल सात महिन्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आयोजित इचलकरंजी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्तारुढ व विरोधक नगरसेवक ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन एकत्र जमल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. तब्बल पाच तास चाललेल्या या सभेत ऐनवेळच्या विषयांसह 87 विषयांवर चर्चा झाली. (Social distance blows up)त्यामध्ये नियोजन व विकास समितीने शिफारस केलेल्या आरक्षण फेरबदल अथवा रद्द करण्यासंदर्भात 46 विषय पुढील सभेत घेण्याच्या निर्णयासह 5 विषय मंजूर करण्यात आले. तर 1 विषय दुरुस्तीसह पुनर्प्रस्ताव पाठवण्याचे ठरले.

MUST READ 

1) एटीएममधून १० हजारांपेक्षा अधिक रक्कम काढताय? लागू होणार ‘हा’ नवा नियम


2) सुरेश रैनाच्या काका आणि चुलत भावांचे मारेकरी सापडले


3) आधी माझी तपासणी करा सांगत तरुण तरुणीची दादागिरी, रुग्णांचे स्वॅब फेकून दिले


4) PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, या 5 चुका केल्यास काढता येणार नाही खात्यातील रक्कम


5) The best student laptops 2020

संपूर्ण देशभरात मार्च महिन्यापासून कोरोेना महामारीचा फैलाव झाल्याने शासनाकडून लॉकडाऊन पुकारण्यात आला. परिणामी इचलकरंजी नगरपरिषदेची सात महिन्यात सभाच होऊ शकली नाही. त्यामुळे विविध विकासकामे आणि प्रस्ताव रखडले होते. 3 जुलै 2020 रोजी नगरविकास विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी बुधवारी विविध 87 विषयांवर चर्चा करण्यासाठी नगरपरिषदेची व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे सर्वसाधारण सभा बोलवली होती. श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहातील वरच्या मजल्यावर एका हॉलमध्ये नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह (Social distance blows up)सत्तारूढ गटाचे नगरसेवक आणि विविध खातेप्रमुख हे ऑनलाईन इतर नगरसेवकांच्या संपर्कात होते. तर विरोधी नगरसेवक हे नगरपरिषदेतील पक्ष कार्यालयात उपस्थित होते.

 सभेच्या कामकाजाला परंपरेनुसार राष्ट्रगीताने सुरूवात करण्यात आली. परंतु त्यानंतर नगरपरिषदेतील कार्यालयात उपस्थित सदस्यांना ऑनलाइन कामकाजात भाग घेताना तांत्रिक अडचणी येऊ लागल्यामुळे सर्वजण तेथून उठले आणि थेट नाट्यगृहातील हॉलमध्ये उपस्थित झाले. त्यामुळे त्याठिकाणी गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला.

मुळात जबाबदार पदाधिकारी आणि अधिकारी यांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधण्यासाठी ऑनलाईन यंत्रणेचा वापर करायचा आणि अन्य सदस्यांनी (Social distance blows up)घरातूनच किंवा अन्य ठिकाणाहून सभेत सहभागी व्हायचे या मुळ उद्देशाला या गर्दीने हरताळ फासला गेला. या गर्दीमुळे सभेत उपस्थित काही अधिकारी व पदाधिकार्‍यांनी हॉलमधून बाहेर पडले व बाहेरुनच कामकाजात सहभागी झाले.