NCB's-big-revelation

सुशांत सिंह राजपूत
मृत्यूप्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनसीबीसमोर रोज धक्कादायक खुलासे होत आहेत.अभिनेत्री रिया चक्रवर्ती Actress Riya Chakraborty ही ड्रग्ज सिंडिकेट्सची एक्टीव्ह मेंबर होती,ज्यामध्ये उच्चभ्रू वर्गातील मोठमोठी नाव आणि सप्लायर्स आहेत. सुशांत सिंगला ड्रग्ज सेवन करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा रियावर आरोप आहे. एनसीबीने यासंदर्भात माहिती दिली. 

सुशांत सिंग राजपूत ड्रग्जचे सेवन करायचा हे रियाला माहिती होतं. पण रियाने त्याला रोखलं नाही तर प्रोत्साहन दिलं आणि पूर्ण बाब लपवून ठेवली हे स्पष्ट झाल्याचे एनसीबीने सांगितले. 

Advertise

सुशांतच्या मृत्यूप्रकरणात रियाच्या भूमिकेबद्दल धक्कादायक खुलासे झाले आहेत. गुन्हेगारी षढयंत्र आरोपाअंतर्गत एनसीबीने पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीच्या जामिनाला विरोध केलाय. ती ड्रग्ज ट्रॅफीकिंगमध्ये सहभागी होती असे पुरावे मिळाले आहेत. ड्रग्ज व्यवहार संदर्भात विचारलेल्या प्रश्नांमध्ये रिया अडचणीत आली. ड्रग्जसाठी प्रोत्साहन देणं आणि त्यासाठी पैशांची मदत करण्यात ती सहभागी होती असा आरोप आहे. 

एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सॅम्युयल मिरांडा आणि दीपेश सावंतला आपण ड्रग्जचे पैसे दिले. त्यानंतर हे ड्रग्ज सुशांतला सेवनासाठी दिले गेल्याचे स्टेटमेंट रियाने दिलंय. ड्रग्जसाठी दिले गेलेले पैसे खासगी वापरासाठी नव्हते हे स्पष्ट आहे. 

साक्षीदाराकडून ५० नावं

ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीच्या चौकशी दरम्यान ड्रग्ज पॅडलर केजे ऊर्फ कमजीतने ५० नाव सांगितली आहेत. जप्त केलेले फोन रिकव्हर करुन एनसीबीला ती नाव मिळवायची आहेत.

राकेश अस्थाना मुंबईत

एनसीबीचे डीजी राकेश अस्थाना स्वत: मुंबईत असून आपल्या दिल्ली आणि मुंबई टीमसोबत महत्वाची बैठक घेणार आहेत. बॉलीवुड ड्रग्ज कनेक्शनसाठी ही बैठक महत्वाची मानली जातेय.

२० जण ताब्यात 

ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ३५ जणांची चौकशी झाली तर २० जणांना ताब्यात घेण्यात आलंय. पण अजूनही तपास सुरुच आहे. सुत्रांच्या माहितीनुसार एनसीबीने आतापर्यंत कोणाला क्लिनचीट दिली नाही. पुढेही तपास सुरुच राहील.