Main Featured

कसबा बावड्यातील फिरस्त्याचा खून; पाचजणांना अटक


Kolhapur- फिरस्त्याकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून पाचजणांनी केलेल्या बेदम मारहाणीत या फिरस्त्याचा मृत्यू (Murder case)झाला. त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी अंबपवाडी रस्त्यावर  हात-पाय दोरीने बांधलेल्या स्थितीत मिळून आला होता. पेठवडगाव पोलिसांनी याचा छडा लावत कसबा बावड्यातील पाच जणांना अटक केली.


निखिल रघुनाथ बिरंजे (वय 25, पिंजार गल्ली), सुशांत जयवंत माने (18, भगतसिंग वसाहत), दत्तात्रय हिंदुराव शिंदे (48, जयभवानी गल्ली), योगेश रवींद्र तांदळे (25, दत्त मंदिर रोड), शुभम सचिन कोळी (21, रा. चावडीजवळ, कसबा बावडा) अशी त्यांची नावे आहेत.   

मृत फिरस्ता हा वेडसर होता. त्याला महाराज नावाने लोक हाक मारत होते. सहा महिन्यांपासून तो कसबा बावड्यातील दत्त मंदिर परिसरात आला होता. काही दिवसांपूर्वी नवनाथ महाराज मंदिरातील पितळी मूर्ती चोरून त्याने एका शेतात पुरल्या होत्या. संशयित निखिल बिरंजे याचा एक भाऊ नवनाथ मंदिरात सेवेकरी आहे.Must Read
मंदिरातील मूर्ती चोरीनंतर हा फिरस्ता सेवेकर्‍याच्या अंगावर धावून गेला होता. या फिरस्त्याच्या त्रासाला कंटाळून या पाचजणांनी त्याला शहराबाहेर सोडण्याचे ठरवले. त्याला महामार्गावरून पुढे नेताच त्याने दगड, विटा अंगावर मारण्यास सुरुवात केली. यामुळे त्याला पाच जणांनी पकडून त्याचे हात-पाय बांधून काठीने मारहाण केली. यानंतर त्याला अंबपवाडीनजीक फेकून सर्वजण निघून गेले. या फिरस्त्याचा याच मारहाणीत मृत्यू (Murder case) झाला. त्याचा मृतदेह पोलिसांना हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मिळून आला होता.