Main Featured

Video: माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी चौघांना अटक


Movie-Bollywood-retired-navy-officer-beaten-sharing

Movie Bollywood बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत Kangana Ranaut आणि शिवसेनेतील वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात दोन्ही समर्थकांमध्ये वॉर सुरु आहे. अशातच एका माजी नौदलाच्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल एक कार्टुन फॉरवर्ड केल्याने त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. कांदिवली येथे राहणाऱ्या नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

भाजपाचे कांदिवली पूर्व येथील आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट Tweet करुन शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शिवसेनेचे कार्यकर्ते कमलेश कदम यांच्यासह ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ६५ वर्षाच्या मदन शर्मा नावाचे माजी नौदल अधिकारी कांदिवली पूर्व येथे ठाकूर कॉम्प्लेक्स येथे राहतात.

शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं एक कार्टून एका व्हॉट्सअप ग्रुपमधून सोसायटीच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केले. यानंतर कमलेश कदम नावाच्या व्यक्तिचा मला फोन आला. त्यांनी माझं नाव आणि पत्ता विचारला. दुपारी ते लोक बिल्डींग खाली आले त्यांनी मला खाली बोलावलं. बिल्डींगच्या गेटवर ८ ते १० जणांनी मला बेदम मारहाण केली. ही घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांनी याबाबत समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कमलेश कदमसह ८ ते १० जणांवर कलम ३२५, १४७, १४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कमलेश कदमसह ३ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबाबत ट्विटरवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.