Main Featured

लग्नाआधीच महिमा होती प्रेग्नंट; या उद्योगपतीसोबत होतं अफेअर


Movie-Bollywood-mahima-chaudhary-birthday-special

Movie Bollywood आज बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीचा Actress Mahima Chaudhari ४७वा वाढदिवस आहे. महिमाचा जन्म १३ सप्टेंबर १९७३मध्ये दार्जिलिंगमध्ये झाला आणि तेथेच तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. ९० च्या दशकाच्या सुरुवातीला महिमाने मिस इंडियाचा खिताब जिंकला होता. त्यानंतर महिमा एका टीव्ही अॅडमध्ये झळकली. महिमाची ही पेप्सी अॅड लोकप्रिय ठरली होती. या अॅडमध्ये महिमा अभिनेता आमिर खान आणि ऐश्वर्या रायसोबत दिसली होती.

साल १९९७ मध्ये महिमाने दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘परदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये Bollywood पदार्पण केले. या चित्रपटात महिमासोबत शाहरुख मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरला होता. महिमाला या चित्रपटासाठी फिल्मफेअरमध्ये बेस्ट डेब्यू पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर महिमाने ‘दाग: द फायर’, ‘प्यार कोई खेल नहीं’, ‘कुरुक्षेत्र’, ‘लज्जा’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’ आणि ‘ओम जय जगदीश’ या चित्रपटांमध्ये काम केले.

त्यावेळी महिमाचे नाव टेनिसपटू लिएंडर पेससोबत जोडण्यात आले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतु त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. ब्रेकअपच्या काही दिवसांमध्येच महिमा लग्न बंधनात अडकली. तिने २००६मध्ये आर्किटेक्ट बिझनेसमॅन बॉबी मुखर्जीशी गुपचुप लग्न केले.

लग्न बंधनात अडकताच काही दिवसांमध्ये महिमा गरोदर असल्याच्या चर्चा होत्या. जेव्हा महिमाने ती गरोदर असल्याचे घोषित केले तेव्हा ती लग्नाआधीच गरोदर असल्याच्या चर्चा सुरु होत्या. काही दिवसांमध्येच महिमाला कन्यारत्न झाले. महिमाने तिचे नाव आरियाना असे ठवले. मात्र माहिमा आणि बॉबीमध्ये लग्नानंतर सतत भांडणे होऊ लागली. अखेर २०१३ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

२०१५मध्ये माहिमाने ‘मुंबई द गॅंगस्टर’ चित्रपटात गॅंगस्टरच्या पत्नीची भूमिका साकारली. त्यानंतर २०१६मध्ये तिने ‘डार्क चॉकलेट’मध्ये काम केले.