Main Featured

मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शिवसेनेकडून होमहवन

Minister Eknath Shinde

राज्याचे सहकार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे लवकरात लवकर कोरोनातून बरे व्हावेत यासाठी इचलकरंजी शहर शिवसेना आणि रविंद्र माने युवाशक्ती यांच्यावतीने जुना सांगली नाका परिसरातील मारुती मंदिरात महामृत्यंजय मंत्र, जप आणि होम हवन करण्यात आला.

शिवसेनेचे उपनेते सहकार मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या उपचार घेत आहेत. ते कोरोनामुक्त होऊन लवकरात लवकर परतावेत यासाठी इचलकरंजी शहर शिवसेना व नगरसेवक  रविंद्र माने युवाशक्ती यांच्या वतीने बुधवारी हा विधी संपन्न झाला. नगरसेवक रविंद्र माने, शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण, रमेश काळे, सुशिल खैरमोडे, दिपक जगताप या मान्यवरांच्या हस्ते होम हवन व महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात आला.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख  महादेव गौड, माजी नगरसेवक भाऊसो आवळे, माजी उपनगराध्यक्षा सौ. सरीता आवळे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सौ. मंगलताई चव्हाण, शहर संघटिका सौ. शोभाताई घोलप, सौ. रुपाली चव्हाण, उपशहर प्रमुख राजू आरगे, सर्वेश भिडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.