Main Featured

राजकारण न करता ताबडतोब ठोस भूमिका जाहिर करावी : सकल मराठा समाज


 इचलकरंजी येथे तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे मराठा समाजाला धक्का बसला आहे. त्यामुळे याबाबत राज्य सरकारने राजकारण न करता ताबडतोब ठोस भूमिका जाहिर करावी या मागणीसाठी शनिवारी इचलकरंजी येथील सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको केला. यावेळी सरकारच्या विरोधामध्ये तिव्र घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यातील मराठा समाजाला नोकरी आणि शिकणामध्ये आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. मात्र कायदेशीर पातळीवर हा निर्णय लागु होत नाही. या मुद्यावर काही याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर निकाल देताना चार दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली होती. 

या स्थगितीमुळे राज्यभरातील सकल मराठा समाजामध्ये संतापाची लाट उमटून आंदोलने सुरू झाली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज इचलकरंजी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र मराठा आरक्षण समन्वय समितीचे सदस्य सुरेशदादा पाटील, शिवतिर्थ समितीचे पुंडलिकराव जाधव, मराठा मंडळाचे अध्यक्ष सुनिल शेलार यांनी उपस्थित मराठा बांधवांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. 

Must Read

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चालु शैक्षणिक वर्षामध्ये शालेय फिची तरतुद ताबडतोब करावी त्याचबरोबर न्यायालयाने आरक्षणाबाबत बाजु मांडण्यासाठी तज्ञ वकिलांची नेमणुक करावी, तसेच सत्तेत बसलेल्या आणि विरोधात असलेल्या सर्वच मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींनी आता ठोस भूमिका घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी अमरजित जाधव, किसन शिंदे, संतोष सावंत, मोहन मालवणकर, शहाजी भोसले, अरविंद माने, राजेंद्र निकम, संजय जाधव, आनंदराव नेमिष्टे, अश्‍विनी कुबडगे, प्रा.रवींद्र पाटील, दीपक रावळ, विजय मुतालीक आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते