marathaPolitics- मराठा (maratha)आरक्षणावर सकारात्मक ठोस निर्णय झाला नाही. आरक्षणाला स्थगिती मिळाली, याचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी मुंबईला (mumbai) जाणारे दूध रोखण्याचा इशारा दिला आहे. गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव प्रकल्प येथे सकाळी नऊ वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. 
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने (court)स्थगिती दिली. याप्रकरणी न्यायालयात समाजाची बाजू मांडण्यात सरकार कमी पडल्याची भावना आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटले आहे. मराठा समाजाच्या विविध संघटना आंदोलनात उतरल्या आहेत. संघटना दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. Must Read

सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी तावडे हॉटेल येथे महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला होता. जिल्ह्यातील सर्व 12 तालुक्यांत एकाच वेळी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णयही कार्यकर्त्यांनी जाहीर केला आहे. विविध संघटना शहरात रोज निदर्शने करीत आहेत. जमेल तितक्या कार्यकर्त्यांसह विविध संघटना रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र आहे. 
मराठा आरक्षण मागणीची तीव्रता शासनाच्या ध्यानात यावी, यासाठी दिवसेंदिवस  आंदोलनाची व्याप्‍तीही वाढत असल्याचे दिसते. या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांनी मुंबईला (mumbai) जाणारे दूध पुरवठा रोखून धरण्याचा इशारा दोन दिवसांपूर्वी दिला होता. 
गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पावर मुंबईला जाणारी दुधाची वाहने कार्यकर्ते रोखून धरणार असल्याची माहिती सचिन तोडकर, दिलीप पाटील, फत्तेसिंह सावंत, राजेंद्र चव्हाण, स्वप्निल पार्टे, सुनील चव्हाण, नितीन देसाई, रवींद्र मुतगी यांनी दिली आहे.