इचलकरंजी मधील इंदिरा गांधी रुग्णालय (IGM) हे कोविड रुग्णालय म्हणून मंजूर झाल्यामुळे तिथे कोरोना रुग्णांच्या वर उपचार केला जात आहे. पण कोरोनाच्या शिवाय इतर आजार असलेल्या सर्वसामान्य लोकांना तिथे उपचार घेता येत न्हवते, ही बाब लक्षात घेऊन माणुसकी फौंडेशनच्या वतीने प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात साहेब यांना निवेदन दिले. व निवेदन देताच साहेबांनी इंदिरा गांधी रुग्णालयातील व्यवस्थापकांना फोन लावून रिकाम्या जागेत नॉनकोविड लोकांवर उपचार करावेत असे आदेश दिले.

 व काहीच दिवसांपूर्वीची घटना, एका अपघात झालेल्या माणसाला फौंडेशनचे सदस्य उपचारासाठी IGM ला नेले असता. त्यांच्यावर उपचार केला नाही पण निवेदन देताच प्रांत साहेबांनी फोन करून आदेश दिल्यावर, काल एका निराधाला फौंडेशनचे सदस्य उपचारासाठी IGM मध्ये नेले असता त्या निराधारावर योग्य ते उपचार रुग्णालयाने केले. 

निवेदन देताच लोकांच्या कल्याणासाठी तात्काळ उपाययोजना करणाऱ्या प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात साहेब यांचे माणुसकी फौंडेशनच्या वतीने मनःपूर्वक आभार.