Let's-blow-up-the-residence-bomb

मंत्रालयाशेजारीच असलेल्या आकाशवाणी आमदार निवासामध्ये मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास बॉम्बचा Bomb निनावी फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आमदार निवास तात्काळ सुरक्षेच्या कारणास्तव रिकामं करण्यात आलं आहे.

Advertise

निनावी फोनमुळे एकच गोंधळ उडाला. तातडीने आमदार निवास MLA residence हे रिकामे करण्यात आले होते. बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आणि चौकशी सुरू केली. बॉम्बचा निनावी फोन आल्याने आकाशवाणी आमदार निवास रिकामं करण्यात आला आहे.

घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व आमदारांना आणि कर्मचाऱ्यांना निवासाच्या बाहेर काढले आहे. बॉम्ब शोधक पथकाने रात्रभर प्रत्येक मजल्यावरील रूम चेक केल्या. तसंच खबरदारी म्हणून आमदार निवासापासून 50 मिटरपर्यंत सर्व बॅरिकेट लावण्यात आले आहे.

आमदार निवासात मध्यरात्रीच्या सुमारास कुणी तरी अज्ञात व्यक्तीने फोन करून आमदार निवास बॉम्बने उडवून देणार आहे, असा निनावी फोन केला होता. त्यानंतर आमदार निवासातील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पण, रात्रभर शोधाशोध केल्यानंतर बॉम्ब सदृश्य वस्तू हाती लागली नाही, त्यामुळे हा निव्वळ कुणी तरी खोडसाळपणा केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा फोन आला कुठून आणि कुणी केला, याचा शोध पोलीस घेत आहे.