Main Featured

स्वर्गीय रत्नाप्पाण्णा कुंभार यांची 111 वी जयंती कारखाना कार्यस्थळावर साजरी

येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय रत्नाप्पाण्णा कुंभार (Late Ratnappanna kumbhar) यांची 111 वी जयंती कारखाना कार्यस्थळावर साजरी करणेत आली. चेअरमन पी. एम. पाटील, व्हा. चेअरमन जयपाल कुंभोजे, सर्व संचालक मंडळ यांनी समाधी स्थळाचे व पूर्णाकृती पुतळयाचे दर्शन घेवून अभिवादन केले.

यावेळी पी. एम. पाटील यांनी, स्वर्गीय आण्णांनी कारखान्याच्या माध्यमातून सहकारी व शैक्षणिक संस्थाची उभारणी केली. शेतकरी व कामगारांच्या कुटुंबाचे कल्याण केले. अनंत अडचणीवर मात करुन कारखाना डौलाने उभा आहे. महाराष्ट्रातील एकमेव कर्जमुक्त कारखाना असून सन 2019-20 गळीत हंगामात रिकव्हरीत हा कारखाना कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या व राज्यात तिसर्‍या क्रमांकावर आहे. 

त्यामुळे शेतकर्‍यांच्या एफआरपी (FRP) चा दर चांगला मिळेल, असे सांगितले. ते म्हणाले, कोरोनाच्या महामारीत कोल्हापूर व सांगली जिल्हात रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी  अभियान सुरु केले आहे. घर टू घर सर्व्हे करुन स्वॅब तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे कोणीही माहिती दडवू नये, वेळेवर व योग्य उपचार करुन घ्यावेत. कुटुंबाची काळजी घेवून सुरक्षित रहावे. सर्वांनी एकजुटीने कोरोनावर मात करुया.

Must Read


स्वागत व प्रास्ताविक कामगार संघ इंटकचे अध्यक्ष आझाद शेख यांनी केले. यानंतर सेवानिवृत्त कामगार तसेच कारखाना व कबनूर येथील स्व. रत्नाप्पाण्णांच्या पुतळयाचे रंगकाम करणारे सुभाष कुंभार यांचा सत्कार चेअरमन पी. एम. पाटील यांचे हस्ते करणेत आला. यावेळी संचालक कुमार खुळ, धनगोंडा पाटील, कल्लू पिराई, जीवंधर पाटील, सुनिल तोरगल, प्रताप नाईक, प्रकाश खोबरे, प्रताप पाटील, संतोष महाजन, भूपाल मिसाळ, लक्ष्मण निंबाळकर, रावसो पाटील, तसेच कारखान्याचे प्र.का. संचालक नंदकुमार भोरे, श्री रेणुका शुगर्स लि, चे एच.आर. मॅनेजर संजय किल्लेदार, डे.जनरल मॅनेजर (केन) सी.एस.पाटील, कामगार अधिकारी आण्णासो पाटील, इंटक उपाध्यक्ष बापूसो उपाध्ये, सर्व सदस्य व पदाधिकारी, कामगार उपस्थित होते. संचालक रावसाहेब भगाटे यांनी आभार मानले.