Main Featured

गावठी दारु हातभट्यांवर छापे : 8 जणांना अटक


 

Impressions-are-gained-in-a-fluid

इचलकरंजी येथील शांतीनगर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभाग व गावभाग पोलिसांच्या  पथकाने संयुक्त कारवाई करत 9 गावठी दारु हातभट्यांवर छापे टाकले. या कारवाईत 7 महिलांसह 8 जणांना अटक केली आहे. लैला प्रेमचंद तमायचे, सुमन मंगेश गागडे, चांदणी संदीप रजपुत, नंदा सावन नेतले, नंदा राजू गागडे, शारदा जयसिंग माछरे, सुनिता राकेश गागडे, चंद्रकांत मधुकर नगरकर अशी त्यांची नांवे आहेत. त्यांच्याकडून 18 हजार रुपयांची देशी-विदेशी दारु जप्त केली आहे.

Advertise

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटोयाबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शांतीनगर परिसरात अवैध दारुच्या हातभट्ट्या सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि गावभाग पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी धाडसत्र मोहिम राबविली. त्यामध्ये विविध 9 ठिकाणी कारवाई करत 8 जणांना अटक केली. तसेच 233 लिटर गावठी हातभट्टी दारू, 5 लिटर देशी दारू, बियरच्या 24 बाटल्या असा 18 हजाराचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला.

या कारवाईत गावभाग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार,  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पांडुरंग पाटील, दुय्यम निरिक्षक राहुल गुरव, श्रीमती वर्षा पाटील, सहाय्यक दुय्यम निरिक्षक जी. एच. हजारे, सुनिल पाटील, जवान सुभाष कोले, प्रसन्नजीत कांबळे, विशाल आळतेकर, श्रीमती ज्योती कंदले, श्रीमती शिगल जिमगे आदी सहभागी झाले होते.