Main Featured

कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Re-increase in the number of corona patients

शहरात पुन्हा कोरोना (Corona) रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज दिवसभरात प्राप्त झालेल्या अहवालानुसार 18 रूग्ण आढळून आले. त्यामध्ये आयजीएम हॉस्पिटलमधील पाच नर्सेसना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे हॉस्पिटल वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही.

आज अखेर रूग्णांची संख्या 3806 वर पोहोचली आहे.  3429 जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या 181 जणांवर उपचार सुरू आहे. आज अखेर 188 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात आयजीएम क्वॉटर्समधील 5 जणांना,  मथुरानगरमधील 3 जणांना, जवाहरनगर भागात 2 जणांना, तर सुतारमळा, दातारमळा, गणेशनगर, मंगळवारपेठ, झेंडाचौक, नाईकमळा, नदीवेस, कापड मार्केट हौसिंग कॉम्प्लेक्स आदी भागात प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला.