Main Featured

42 कर्मचार्‍यांचे समावेशन व इतर प्रश्‍नासंदर्भात मुंबई येथे बैठक आयोजित


 

Inclusion of 42 employees

इचलकरंजी येथे आयजीएम कडील 42 कर्मचार्‍यांचे समावेशन, कोविडच्या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्यक व्हेंटीलेटरसह आवश्यक सुविधा आणि स्टाफची भरती करावी, रुग्णालय व कर्मचारी निवासस्थानासाठी मंजूर निधी तातडीने मिळावा तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे 300 बेडचे करावे व हे रुग्णालय मल्टिस्पेशालिटी रुग्णालय व्हावे या प्रश्‍नासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  (Rajesh Tope) यांनी  मंगळवार 29 सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.

Advertise

Must Read

1) महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

2) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस photo

3) 'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत

4) 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

5) आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..

सन 2016 मध्ये इचलकरंजी नगरपरिषदेने इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) राज्य शासनाकडे हस्तांतर केले. त्यानंतर त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय असे नांव दिले. त्यावेळी रुग्णालयाकडील डॉक्टर्स, नर्सेस व अन्य तंत्रज्ञ अशा 42 जणांना शासनाने आरोग्य विभागाने अद्यापही सामावून घेतलेले नाही.  आयजीएम रुग्णालय हे पूर्णत: कोविड रुग्णालय आहे. याठिकाणी 20 बेडचा आयसीयु विभाग सुरु असून याठिकाणी 34 व्हेंटीलेटरची तातडीने आवश्यकता आहे.  सध्या हे रुग्णालय 200 बेडचे असून कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता याठिकाणी आणखीन 100 बेडची गरज असल्याने या रुग्णालयास 300 बेडची मान्यता देऊन उपलब्धता करुन द्यावी, अशी मागणी केली आहे.

शासनाने  इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय व कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक 18.27 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तो मिळावा  या सर्व प्रश्‍नासंदर्भात मंगळवारी (29 रोजी) मुंबई मंत्रालयात बैठक होत आहे.