Main Featured

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारांसाठी अमेरिकेत


Health-Department-Sonia-Gandhi-in-the-US-for-treatment

Health Department काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी Sonia Gandhi उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधीही अमेरिकेला गेले आहेत. हे रुटीन मेडिकल चेक अप आहे अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे या अधिवेशनात सोनिया गांधी उपस्थित राहू शकणार नाहीत. सोनिया गांधी दोन आठवड्यांनी भारतात परततील असंही काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितल्याचं एएनआयने म्हटलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी हे एका आठवड्याने भारतात परतणार आहेत. त्यानंतर ते पावसाळी अधिवेशनात सहभागी होतील असंही काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.