Main Featured

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत 422 रुपयांची तेजी


Gold Price Today

  भारतीय रुपया घसरल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या किंमतीमुळे देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे भाव (Gold Price Today) वाढले आहेत.  दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याची किंमती प्रति तोळा 422 रुपयांनी वाढली आहे. दरम्यान चांदीचे भाव (Silver Price Today) 1,013 रुपये प्रति किलोने वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते सध्याच्या स्तरावरून अधिक तेजीने सोन्याचे भाव वाढतीय याची शक्यता कमी आहे.  कारण जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) लशीसंदर्भात अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात सोन्याच्या किंमती कमी होऊ शकतात.

सोन्याचे नवे भाव  (Gold Price on 15th September 2020)

मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 422 रुपयांनी वाढली आहे. यामुळे सोन्याचे दर 53,019 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. याआधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर 52,597 रुपये प्रति तोळावर  बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव वाढले आहेत. याठिकाणी सोन्याचे दर 1,963 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.

Must Read

चांदीचे नवे भाव (Silver Price on 15th September 2020)

चांदीच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे दर 1013 रुपये प्रति किलोने वाढले आहेत. या वाढीनंतर चांदीची किंमत प्रति किलो 70,743 रुपये वर पोहोचली आहे. याआधीच्या सत्रात चांदीचा भाव 69,730 रुपये प्रति किलोग्राम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे नवे भाव वाढून 27.31 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

सोन्याचांदीचे भाव वाढण्याचे कारण

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते रुपयामध्ये घसरण झाली आहे. ज्यामुळे या मौल्यवान धातूच्या किंमती वाढल्या आहेत.