Main Featured

नराधमांनी सामूहिक बलात्कार करून 19 वर्षीय तरुणीची जीभ कापली


Gang-rape

उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gang Rape Victim) येते 15 दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या नराधमांनी तिची जीभ कापली, गंभीर अवस्थेत असलेल्या या तरुणीवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी पीडितेचे निधन झाले.

गंभीर जखमी पीडित तरुणीला आधी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. नंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात घेऊन दिल्लीतील एम्सला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 15 दिवसांपूर्वी हाथरसमध्ये सामूहिक बलात्काराची ही घटना घडली होती.

मंगळवारी सकाळी सामूहिक बलात्कार rape 

Advertise

पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी आरोपींनी महिलेचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पीडितेने स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपींनी तरुणीची जीभ कापली होती. गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या तरुणीवर एम्समध्ये उपचार सुरू होते, मात्र या पीडितेला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.

पीडित महिला व्हेंटिलेटरवर होती

दिल्ली एम्समध्ये रेफर होण्यापूर्वी जेएनएमसीचे अधीक्षक डॉक्टर हॅरिस मंजूर खान यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, पीडिता व्हेंटिलेटरवर आहे. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की पीडितेच्या पायांना आणि हाताला अर्धांगवायू झाला होता. पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचे समजून तिच्या कुटुंबातील सदस्यांना चांगल्या उपचारासाठी दिल्ली येथे पाठवण्यात आले.

आरोपींनी दिली होती जिवे मारण्याची धमकी

हाथरसच्या चांदपा भागात आईसह चारा आणण्यासाठी गेलेल्या तरूणीवर गावातीलच 4 नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला, मात्र युवतीच्या किंचाळ्यामुळे नराधम पळून गेले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी मुलीला अलीगडच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. यापूर्वी हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रम वीर यांनी सांगितले होते की 14 सप्टेंबर रोजी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.