Main Featured

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

gang rape case

Sangli- चौदा वर्षीय अल्पवीयन मुलीवर सामूहिक बलात्कार (gang rape case)केल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीचे अतिरिक्त सत्र न्यायाधिश डी. एस. हातरोटे यांच्या आदेशावरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.बबन बेरड काळे, रवि बेरड काळे, बबलू पपलू शिंदे व पिडीत मुलीची चुलती ( सर्वजण रा. हाजापूर ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर  आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


पिडीत मुलगी 2 वर्षाची होती, तेव्हा तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला होता. तिच्या आटपाडी येथील चुलत्यांनी तिचा गेली 12 वर्ष सांभाळ केला आहे. दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजी तिचे चुलते स्वतःच्या उपचारासाठी सांगली येथील दवाखान्यात गेले होते. त्या दिवशी दुपारी 12 वाजता चौघे संशयित दोन मोटार सायकलवरून पिडीत मुलीच्या घरी गेले. त्यावेळी घरात पिडीत मुलगी एकटीच होती.


हे वाचा

2) Kolhapur - नगराध्यक्ष पदावर टांगती तलवार
दारूच्या नशेत असलेल्या बबन, रवी व बबलू यांनी पिडीत मुलीला उचलून शेजारच्या खोलीत नेले व तिघांनी अमानुष बलात्कार (gang rape case)केला. संशयित महिलेने तिचे हात पाय धरून त्या तिघांना मदत केली व गुन्हा करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर ते चौघेजण तेथून निघून गेले.रात्री 9:30 वाजता पिडीत मुलीचा चुलते घरी गेले तेव्हा तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला.

चुलते पिडीत मुलीला घेवून आटपाडी पोलिसात तक्रार देण्यास गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला होता. म्हणून त्यांनी अ‍ॅड. विलास फाळके यांच्यामार्फत सांगली येथील सत्र न्यायालयात तक्रार दिली होती.

न्यायालयाने (court)पिडीत मुलीचा इनडोअर जवाब नोंदविला. सदरची घडलेली घटना गंभीर असून केवळ गुन्हा नोंद होवून उपयोग नाही तर साक्षी, पुरावे एकत्र करण्यासाठी सखोल पोलिस तपासाची गरज आहे, असे मत नोंदवत या गुन्हयाचा तपास करून आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्याचे आदेश न्यायाधिशांनी दिले आहेत.

या गुन्हयातील संशयीत महिला आरोपी वादग्रस्त आहे. ती महिला पिडीत मुलीची चुलती व फिर्यादीची पत्नी आहे. अन्य तीन संशयितांनी तिचे अपहरण करून हाजापूरला पळवून नेण्याचा बनाव काही वर्षापूर्वी केला होता.