Main Featured

तीनपानी जुगार खेळणार्‍या चौघाजणांना अटक


                                               ये ताश के बावन पत्ते : The Dainik Tribune

इचलकरंजी येथे चंदूर येथील कुमार विद्या मंदिराच्या मागे उघड्यावर तीनपानी जुगार खेळणार्‍या चौघाजणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. वैभव अशोक पाटील (वय 32, रा. गावभाग, डबरा गल्ली), उत्तम गणपती लोहार (वय 28), अमोल विजय पाटील (वय 21), चंद्रकांत कल्लाप्पा नरगट्टे (वय 51, तिघे रा.  रा. महासिद्ध मंदिरासमोर, चंदूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 51 हजार 70 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये रोख रक्कम, 3 मोटरसायकली, जुगाराचे साहित्याचा समावेश आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

हेही वाचा 

1) इचलकरंजीत "या' संघटना आक्रमक, केली जोरदार निदर्शने

2) कोल्हापूरकरांची चिंता वाढली

3) काय आहे कोल्हापुराच्या जनता कर्फ्युची परिस्थिती

4) कोल्हापूरात तरुणाचा निर्घृण खून

5) सांगलीत जनता कर्फ्यूचा उडाला बोजवारा

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चंदूर येथील कुमार विद्या मंदिर शाळेच्या मागील बाजुस उघड्यावर तीनपानी जुगार खेळत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून वरील चौघांना ताब्यात घेतले. तर रोख 1 हजार 70, पत्त्याची पाने, 3 मोटरसायकली जप्त केल्या. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोसई मुळीक करत आहेत.